ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती
ग्रामपंचायत माहिती
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या तीर्थस्थळा पैकी एक असलेले प्रसिद्ध तीर्थस्थळ सर्वतिर्थटाकेद च्या उत्तरेस ५ कि.मी. अंतरावर कडवा धरणजवळ भरविर बु व डोंगराच्या कुशीत भंडारदरावाडी गाव वसलेले आहे.नाशिक जिल्ह्यातील व ईगतपुरी तालुक्यातील शेवटचे गाव असून नाशिकच्या आग्नेय दिशेस नाशिक पासून वाडीवर्हे मार्गे ५० कि.मी. व देवळाली मार्गे ४५ कि.मी. अंतरावर आहे. मुख्य बाजारपेठ घोटी व भगुर आहे. ग्रुप ग्रामपंचायत भरविर बु., भंडारदरावाडी ची स्थापना २९/०६/१९५१ रोजी झाली आहे. ग्रुप ग्रामपंचायत भरविर बु., भंडारदरावाडी मध्ये ०४ वार्ड असुन सदस्य संख्या ११ आहे .
ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

सरपंच
सौ.संगिता अरुण घोरपडे

उपसरपंच
श्रीमती द्रौपदाबाई बहिरू चौरे
भरविर बु. २०११ च्या जनगणनेचा तपशील
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| विभाग | माहिती |
|---|---|
| गावाचा संक्षिप्त परिचय | महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थस्थळ सर्वतीर्थ टाकेदच्या उत्तरेस ५ कि.मी. अंतरावर, कडवा धरणाजवळ, डोंगराच्या कुशीत भरविर बु. व भंडारदरावाडी हे गावे वसलेले आहेत. गाव नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असून नाशिकहून वाडीवर्हे मार्गे ५० कि.मी. व देवळाली मार्गे ४५ कि.मी. अंतरावर आहे. मुख्य बाजारपेठा घोटी व भगूर आहेत. |
| ग्रामपंचायत स्थापना दिनांक | २९ जून १९५१ |
| ग्रामपंचायत अंतर्गत गावे | भरविर बु. आणि भंडारदरावाडी |
| वार्ड व सदस्य संख्या | एकूण ४ वार्ड | सदस्य – ११ |
| मुख्य व्यवसाय | शेती (मुख्य पीक – भात), भुईमुग, सोयाबीन, ऊस, टोमॅटो, कांदा, कोबी, गहू, हरबरा, इतर भाजीपाला |
| पूरक व्यवसाय | शेळीपालन, गुरेपालन, कोंबडीपालन, नाशिक व मुंबई येथे नोकरी/व्यवसाय |
| एकूण भू-क्षेत्र (हे.आर) | २२३३.३७.८९ |
| शेतीयोग्य क्षेत्र | १६००.८३.३५ हे.आर (भरविर बु. – १०६०.६७.०५, भंडारदरावाडी – ५४०.१६.३०) |
| वन क्षेत्र | ५५०.३१.४० हे.आर |
| गावठाण क्षेत्र | १४.४३.०० हे.आर |
| इतर क्षेत्र | रस्ते व शिव – ४५.०३.०० हे.आर, कूरण – १.६५.००, पोटखराब – २१.१२.१४ |
| एकूण लोकसंख्या (जनगणना २०११) | ३९८२ (पुरुष: २०४५, स्त्रिया: १९३७) |
| अनुसूचित जाती | २२१ (पुरुष: १२२, स्त्रिया: ९९) |
| अनुसूचित जमाती | १७६५ (पुरुष: ९७२, स्त्रिया: ८५३) |
| इतर लोकसंख्या | १९९६ (पुरुष: १०११, स्त्रिया: ९८५) |
“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”
गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला
राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |